नेमकी ही गरज लक्षात घेऊनच आम्ही, वेद गुरुकुल या आमच्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये गाजलेल्या “स्मरणशक्तीचे तंत्र, मंत्र व अभ्यास कौशल्ये” या कार्यशाळेत, विविध उपक्रमाद्वारे ही कौशल्ये विकसित करत आहोत. या कार्यशाळेवर आधारित ‘स्मरणशक्ती चे तंत्र आणि अभ्यासाचे मंत्र’ हे पुस्तक सादर करताना आम्हाला आनंद होत आहे, जेणे करून जे शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षक, स्पर्धापरिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी इत्यादी, ही कार्यशाळा प्रत्यक्ष रूपाने करू शकत नाही त्यांना याचा निश्चितच फायदा होईल.